Iran Visa Free For Indian Tourists : इराणने पर्यटन आणि प्रवास क्षेत्राला चालना देण्यासाठी भारतासह 33 नवीन देशांतील पर्यटकांसाठी व्हिसाची आवश्यकता रद्द केली आहे. अशा परिस्थितीत भारतीय नागरिकांना यापुढे इराणमध्ये जाण्यासाठी व्हिसाची गरज भासणार नाही. इराणचे सांस्कृतिक मंत्री, पर्यटन आणि हस्तकला मंत्री एझातोल्लाह जरघामी यांनी ही माहिती दिली.
इराणचे सांस्कृतिक वारसा, पर्यटन आणि हस्तकला मंत्री एझातोल्लाह जरघामी यांनी राज्य वृत्तसंस्था IRNA ला सांगितले की, “जगभरातील देशांमधून अधिकाधिक अभ्यागतांना आकर्षित करण्यासाठी आणि इराणला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. जरघामी म्हणाले की, या निर्णयाचा उद्देश केवळ पर्यटन वाढवणे नाही, तर इराणबाबत निर्माण झालेले वातावरण संपवणे हा आहे. ज्या ३३ देशांच्या नागरिकांसाठी व्हिसाची आवश्यकता रद्द करण्यात आली आहे.”
व्हिसाची आवश्यकता रद्द करण्यात आलेल्या देशांमध्ये भारत, रशिया, संयुक्त अरब अमिराती, बहरीन, सौदी अरेबिया, कतार, कुवेत, लेबनॉन, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, ट्युनिशिया, टांझानिया, झिम्बाब्वे, मॉरिशस, शेल्स, इंडोनेशिया, ब्रुनेई, दारेसलाम, जपान, सिंगापूर, कंबोडिया, मलेशिया, व्हिएतनाम, ब्राझील, पेरू, क्युबा, मेक्सिको, व्हेनेझुएला, बोस्निया आणि हर्जेगोविना, सर्बिया, क्रोएशिया आणि बेलारूस या देशांचा समावेश आहे.
इराणने ज्या देशांच्या नागरिकांना सुविधा पुरविल्या आहेत त्यामध्ये पाकिस्तानचे नाव नाही. इराणने यापूर्वीच तुर्की, अझरबैजान, ओमान, चीन, आर्मेनिया, लेबनॉन आणि सीरियामधील लोकांना व्हिसाची आवश्यकता माफ करण्याची परवानगी दिली आहे. इराणी मीडियानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी इराणमध्ये पर्यटकांची संख्या ४८ टक्क्यांनी वाढली असून ४४ लाखांवर पोहोचली आहे.
भारतीय या देशांमध्ये जाऊ शकतात व्हिसाशिवाय
भारतीय अनेक देशांना विना व्हिसा देऊन भेट देऊ शकतात. यामध्ये भूतान, इंडोनेशिया, मालदीव, थायलंड, फिजी, पलाऊ बेटे, मार्शल बेटे, तुवालू, वानुआतू, ओमान, अल्बेनिया, सर्बिया, जॉर्डन, डोमिनिका, जमैका, मोन्सेरात, सेंट किट्स आणि नेव्हिस, ग्रेनाडा, बार्बाडोस, कतार आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. समाविष्ट आहेत. एकूण 57 देश आहेत जिथे भारतीयांसाठी व्हिसा ऑन अरायव्हल आहे.