Nitesh Rane : भाजप नेते नितेश राणे यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी सलीम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. सलीम कुत्ता हा मुंबई बॉम्बस्फोट (Mumbai Bomb Blast) खटल्यातला प्रमुख आरोपी आहे, बडगुजर पॅरोलवर असताना बडगुजर यांनी ही पार्टी केली असा आरोप नितेश राणेंनी केलाय.
नितेश राणे यांनी विधानसभेत या पार्टीचे फोटो दाखवून यावर कारवाईची मागणी केली. दरम्यान, नितेश राणे यांनी केलेल्या मागणीची दखल घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले. सुधाकर बडगुजर यांचा पार्टी करत असातनाचा फोटो नितेश राणेंनी सभागृहात दाखवला आहे.
या सर्व प्रकरणावर नितेश राणे यांनी, दाऊदच्या जवळचा मुख्य आरोपी १९९३ च्या ब्लास्टचा आरोपी हा जन्मठेप भोगत आहे. पॅरोलच्या शेवटच्या दिवशी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नाशिक अध्यक्षासोबत पार्टी करतो. सुधाकर बडगुजर यांचा पार्टी करत असातनाचा फोटो आणि व्हिडीओ आहेत.1993 चा बॉम्ब ब्लास्ट हा देशाला हादरवणारा होता. यातील आरोपी सलिम कुत्ता हा पेरोलवर असताना तो पार्टी करतो. उद्धव ठाकरे गटाचा नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या सोबत पार्टी करतो, हे गंभीर आहे. याला कोणाचा पाठींबा आहे.? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान, नितेश राणेंनी केलेल्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीसांनी एसआयटीची घोषणा केली. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी, सलीम कुत्ता बॉम्ब स्फोटातील मुख्य आरोपी आहे. दाऊदच्या जवळचा सहकारी आहे . पेरोलवरती असताना पार्टी करायची . कुत्ता याच्यासोबत कुणाचा संबंध आहे. त्यात आणखी कोणाचा संबंध आहे का याची चौकशी केली जाणार आहे. एसआयटीच्या माध्यमातून वेळेत चौकशी केली जाणार आहे” अशी माहिती त्यांनी दिली.