पुणे : आयपीएल 2022 (IPL 2022) चा 57 वा सामना आज खेळला जात आहे. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने लखनौविरुद्ध नाणेफेक(टाॅस) जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
#GujaratTitans have won the toss and they will bat first against #LSG.
Live – https://t.co/45TbqyBfE3 #LSGvGT #TATAIPL pic.twitter.com/pQB53PfPD3
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2022
या सामन्यासाठी गुजरात संघात तीन बदल करण्यात आले आहेत. लॉकी फर्ग्युसन, साई सुदर्शन आणि प्रदीप सांगवान यांच्या जागी साई किशोर, यश दयाल आणि मॅथ्यू वेड यांचा समावेश करण्यात आला आहे. तर दुसरीकडे लखनौ संघात फक्त एक बदल करण्यात आला आहे. रवी बिश्नोईच्या जागी करण शर्माचा समावेश करण्यात आला आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग-11 खालीलप्रमाणे…
गुजरात टायटन्स प्लेइंग-11 : शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), मॅथ्यू वेड, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, अल्झारी जोसेफ, आर साई किशोर, मोहम्मद शमी, यश दयाल
लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग-11 : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), केएल राहुल (कर्णधार), दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पांड्या, आयुष बडोनी, जेसन होल्डर, आवेश खान, मोहसिन खान, दुष्मंता चमीरा, करण शर्मा
दरम्यान, लखनौ आणि गुजरात या दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केली आहे. दोन्ही संघांचे सध्या समान गुण आहेत, मात्र निव्वळ धावगतीच्या आधारावर लखनौ अव्वल तर गुजरात दुसऱ्या स्थानावर आहे. लखनौ 11 सामन्यांतून 8 विजय आणि 16 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. तर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातचा संघ तितकेच सामने खेळून आठ विजय आणि 16 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.