दुबई – अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नाबीने टाॅस जिकूंन क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारणं केलं आहे. (Afghanistan won the toss and elected to field) भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात खेळत नाहीये. त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी केएल राहुल कर्णधार आहे.
रोहितशिवाय हार्दिक पांड्या आणि युझवेंद्र चहल हेही खेळत नाहीत. अक्षर पटेल, दिनेश कार्तिक आणि दीपक चहर यांचे संघात पुनरागमन झाले आहे.
दोन्ही संघांचे प्लेइंग 11 :-
अफगाणिस्तान : हजरतुल्ला झझाई, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम जद्रान, नजीबुल्ला झदरान, मोहम्मद नबी (कर्णधार), करीम जनात, राशिद खान, अजमातुल्ला ओमरझाई, मुजीब उर रहमान, फरीद अहमद मलिक, फझलहक फारुकी.
ASIA CUP 2022. Afghanistan XI: M Nabi (c), H Zazai, R Gurbaz (wk), I Zadran, K Janat, N Zadran, A Omarzai, R Khan, F Malik, M Rahman, F Farooqi. https://t.co/1UkuWxy3Ee #INDvAFG #AsiaCup2022
— BCCI (@BCCI) September 8, 2022
भारत : केएल राहुल (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुडा, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग.
A look at our Playing XI for the game.
Live – https://t.co/QklPCXU2GZ #INDvAFG #AsiaCup2022 pic.twitter.com/QHicRuYneJ
— BCCI (@BCCI) September 8, 2022
दरम्यान, आशिया चषकाच्या सुपर-4 फेरीत गुरुवारी भारत आणि अफगाणिस्तानचे संघ थोडयाच वेळात आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. या स्पर्धेतील दोन्ही संघांचा हा शेवटचा सामना असून दोन्ही संघांना विजयासह स्पर्धेतील आपला प्रवास संपवायचा आहे. पाकिस्तानपाठोपाठ टीम इंडियाचा श्रीलंकेकडून पराभव झाला. त्याचवेळी अफगाणिस्तानला आधी श्रीलंकेने आणि नंतर पाकिस्तानने पराभूत केले.
तसेच भारत आणि अफगाणिस्तानचे संघ चौथ्यांदा T20 क्रिकेटमध्ये आमनेसामने येणार आहेत. टीम इंडियाने यापूर्वी खेळलेले तिन्ही सामने जिंकले आहेत. भारताने 2010 मध्ये अफगाणिस्तानचा सात विकेटने, 2012 मध्ये 23 धावांनी आणि 2021 मध्ये 66 धावांनी पराभव केला होता. गेल्या वर्षी UAE मध्ये झालेल्या T20 विश्वचषकानंतर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील हा पहिला T20 सामना असेल.