पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनिदाद) :– इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघ आता वेस्ट इंडिजमध्ये आहे. तिकडे त्रिनिदादमध्ये तीन वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिकेची सुरुवात करायची आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतील भारताचा विक्रमही उत्कृष्ट आहे. भारताने गेल्या 16 वर्षात येथे एकही वनडे मालिका गमावलेली नाही आणि आता हा विक्रम कायम ठेवण्याची जबाबदारी धवनवर आहे.
वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. निकोलस प्रथमच घरच्या मैदानावर वनडेमध्ये संघाचे नेतृत्व करत आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करेल. गुडघ्याच्या दुखापतीमुळे रवींद्र जडेजा या सामन्यात खेळत नाहीये. दुसऱ्या वनडेतही तो खेळणार नाही.
भारतीय संघ प्लेइंग11 :-
शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), दीपक हुडा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, प्रणंद कृष्णा.
वेस्ट इंडिज संघ प्लेइंग11 :-
शाई होप (विकेटकीपर), ब्रँडन किंग, शामराह ब्रूक्स, निकोलस पूरन (कर्णधार), रोव्हमन पॉवेल, अकील होसेन, रोमॅरियो शेफर्ड, काइल मेयर्स, गुडाकेश मोती, अल्झारी जोसेफ, जेडेन सिल्स.