झापुरझिया (युक्रेन) – युक्रेनमधील मारिऊपोल या बंदराबरोबरच रशियाने ओडेसा शहरावरही जोरदार मारा करायला सुरुवात केली आहे. युक्रेनला केला जात असलेला शस्त्रांचा पुरवठा खंडीत करण्याच्या उद्देशानेच हा मारा केला जात आहे.
दरम्यान मारिऊपोल शहरात अडकलेल्या बहुतेक नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. मात्र अजूनही सुमारे 100 जण तेथे अडककले असल्याचा संशय युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. रशियाकडून सुरू असलेल्या माऱ्यामुळे भूमिगत बंदरांमध्ये लपलेल्या उर्वरित नागरिकाची सुटका अवघड बनली आहे, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान ईशान्येकडील ज्या भागात रशियाने काही दिवसांपूर्वी मारा केला होता, तेथील इमारतींच्या ढिगाऱ्यांमधून आणकीन 44 नागरिकांचे मृतदेह सापडले असल्याचे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
रशियाने काळ्या समुदायातून ओडेसा शहरावर एकूण 7 क्षेपणास्त्रे डागली आहेत. त्यात एक शॉपिंग सेंटर आणि एक गोदाम नष्ट झाले. यात एक जण ठार झाला असून पाच जण जखमी झाले आहेत, असे लष्कराने सांगितले.