मुंबई – आज, IPL 2022 च्या 40 व्या सामन्यात गुजरात टायटन्स (GT) ची सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध लढत होईल. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 Toss Update 🚨@gujarat_titans have elected to bowl against @SunRisers.
Follow the match ▶️ https://t.co/r0x3cHhUK0#TATAIPL | #GTvSRH pic.twitter.com/ewBEuQZC4Q
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2022
हार्दिकने प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्याचबरोबर सनरायझर्स हैदराबाद संघात एक बदल करण्यात आला आहे. जगदीश सुचितच्या जागी कर्णधार केन विल्यमसनने वॉशिंग्टन सुंदरचा प्लेईंग-11 मध्ये समावेश केला आहे. दुखापतीमुळे सुंदर गेल्या काही सामन्यांत संघाबाहेर होता.
गुजरातच्या संघात डेव्हिड मिलर, राशिद खान, अल्झारी जोसेफ आणि लोकी फर्ग्युसन असे चार विदेशी खेळाडू आहेत. त्याचबरोबर हैदराबाद संघात विल्यमसन, एडन मार्कराम, मार्को यानसेन आणि निकोलस पूरन हे चार विदेशी खेळाडू आहेत.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग-11 : अभिषेक शर्मा, केन विल्यमसन (कर्णधार), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, निकोलस पूरन (विकेटकीपर), शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, मार्को यानसेन, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, टी नटराजन.
गुजरात टायटन्स प्लेइंग-11 : ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, अल्झारी जोसेफ, लोकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद शमी.
दरम्यान, गुजरातचा संघ सात सामन्यांपैकी सहा सामने जिंकून १२ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचवेळी, सनरायझर्स हैदराबाद संघ 10 गुणांसह आणि सातपैकी पाच सामने जिंकत तिसऱ्या स्थानावर आहे.