दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आयपीएल सामना; हायअलर्ट जारी 

मुंबई – इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यादरम्यान दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियम दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असू शकते. यासंबंधी सुरक्षा यंत्रणांकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थाही वाढविण्यात आली आहे.

सूत्रांनुसार, मुंबई वानखेडे स्टेडियम दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. यासाठी पार्किंग एरियाचाही वापर होऊ शकतो. विदेशी खेळाडूंच्या बसवर फायरिंग होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. तसेच ज्या हॉटेलमध्ये खेळाडू थांबतात ती हॉटेलही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचे समजत आहे. याठिकाणी पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.