क्योंकि मंत्री भी कभी ग्रेजुएट थीं-प्रियांका चतुर्वेदी

राहुल गांधी यांच्या विरोधात उत्तर प्रदेशातील अमेठी मतदार संघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपाच्या उमेदवार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी उमेदवारी अर्ज भरताना आपल्या शपथपपत्रात नमूद केलेल्या शिक्षणावरून आता काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी 2014 च्या निवडणूक शपथपत्रात नमूद केले होते की, आपण 1994 साली विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. मात्र आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भरलेल्या शपथपत्रात स्मृती यांनी निवडणूक आयोगाला सांगितले आहे की, 1994 साली त्यांनी दिल्ली स्कूल ऑफ ओपन लर्निंग युनिव्हर्सिटीच्या तीन वर्षाच्या अभ्यासक्रमात बॅचलर ऑफ कॉमर्स (भाग -1) पूर्ण केलेला नाही.

स्मृती इराणींच्या शपथपत्रात शिक्षणाबाबत बदललेल्या माहितीवरून टीका करत काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर त्यांच्याच मालिकेच्या थीम लाईनच्या तालावर गाणे तयार करून टीका केली आहे. त्या म्हणतात, ‘एक नवीन मालिका येणार आहे. ‘क्योंकि मंत्री भी कभी ग्रेजुएट थीं, ‘क्वालिफिकेशन के भी रूप बदलते हैं, नए-नए सांचे में ढलते हैं, एक डिग्री आती है, एक डिग्री जाती है, बनते एफिडेविट नए हैं.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.