#IPL : आयपीएल लिलाव 21 जानेवारीला होणार

चेन्नई – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमासाठीचा खेळाडूंचा लिलाव 11 फेब्रुवारीला होण्याचे संकेत बीसीसीआय व आयपीएल समितीने दिले आहेत. अनेक संघ आपल्याकडील सुमार कामगिरी केलेल्या खेळाडूंना मुक्त करणार असून त्यात प्रामुख्याने महाराष्ट्राचा फलंदाज केदार जाधव याला चेन्नई सुपर किंग्जचा संघ डच्चू देण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. 

या लिलावापूर्वी स्पर्धेतील आठही संघांना संघात कायम ठेवले जाणार असलेल्या तसेच मुक्त करण्यात येत असलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्यासाठी 21 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

आयपीएलच्या प्रशासकीय समितीच्या झालेल्या ऑनलाइन बैठकीत यंदाच्या मोसमातील स्पर्धेबाबत काही आराखडे निश्‍चित करण्यात आले आहेत. त्यानुसार खेळाडूंच्या अदलाबदलीसाठी 4 फेब्रुवारीची मुदत देण्यात आली आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना येथे होत असून त्याच कालावधीत ही लिलाव प्रक्रिया पार पाडणार आहे.

चेन्नई सुपर किंग्जच्या खात्यावर फक्त 15 लाख रुपये बाकी आहेत. त्यामुळे अधिक रक्कम खात्यावर शिलकीत राहावी, याकरिता केदार जाधव आणि पीयूष चावला यांना चेन्नईकडून वगळणे जाण्याची दाट शक्‍यता आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबकडे सर्वाधिक 16 कोटी, 50 लाख रुपये शिलकीत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून लिलावात मोठी अदलाबदल होऊ शकते.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.