कोलंबो – श्रीलंकेतील आर्थिक तसेच राजकीय परिस्थितीचा फटका भारतात सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेलाही बसला आहे. अनेक वाहिन्या व वृत्तपत्रांनी सद्य परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले असल्यामुळे तसेच मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केल्यामुळे आयपीएलचे वार्तांकन जवळपास बंद केले आहे.
आर्थिक संकटाचा फटका श्रीलंकेमधील सर्वच क्षेत्रांना बसला असून प्रसिद्धी माध्यमांमधून अनेक लोकांचे रोजगार गेले आहेत. टीव्ही वाहिन्यांनी कर्मचारी कपात केली असून त्यांना मिळत असलेल्या जाहिरातीही बंद झाल्या आहेत.
स्पर्धेचे थेट प्रक्षेपणही थंडावले आहे. श्रीलंका सरकारने शाळांच्या परीक्षाही रद्द केल्या आहेत. आयपीएल सामन्यांचं प्रक्षेपण रद्द झाल्याने याचा परिणाम जाहिरातींवर आणि पर्यायाने चॅनेल तसेच आयपीएलच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईवर झाला आहे.