IPL 2024 KKR vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी)चा फलंदाज विराट कोहली संघाच्या तिसऱ्या सामन्यात एक विशेष कामगिरी आपल्या नावावर करू शकतो. आयपीएल 2024 चा 10 वा सामना आज (शुक्रवार, 7.30 वाजता) एम चिन्नास्वामी स्टेडियमवर RCB आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात खेळवला जाईल.
आरसीबीने त्यांच्या मागील सामन्यात पंजाब किंग्जचा पराभव केला होता, तर केकेआरने पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून 17व्या सत्राची सुरुवात केली होती. केकेआरविरुद्ध तीन षटकार मारण्यात कोहली यशस्वी ठरला तर तो आयपीएलमध्ये कोणत्याही फ्रँचायझीसाठी सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनेल.
आयपीएलमध्ये एकाच संघासाठी सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आरसीबीचा माजी सलामीवीर ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने आरसीबीसाठी 85 सामने खेळले आणि या कालावधीत त्याने 239 षटकार मारले. दुसऱ्या स्थानावर याच संघाकडून खेळणाऱ्या एबी डिव्हिलियर्सचे नाव आहे, ज्याने आरसीबीसाठी 156 सामन्यांमध्ये 238 षटकार ठोकले आहेत.
माजी कर्णधार कोहली तिसऱ्या स्थानावर आहे. कोहलीने आरसीबीसाठी आतापर्यंत 239 सामने खेळले आहेत आणि त्याच्या बॅटमधून 237 षटकार मारले आहेत. म्हणजे, जर कोहलीने तीन षटकार मारले तर तो गेल आणि डिव्हिलियर्सला मागे टाकेल आणि कोणत्याही संघासाठी सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनेल.
आयपीएलमध्ये एका संघासाठी सर्वाधिक षटकार
1. ख्रिस गेल (आरसीबी) 85 सामने 239 षटकार
2. एबी डीव्हिलियर्स (आरसीबी) 156 सामने 238 षटकार
3. विराट कोहली (आरसीबी) 239 सामने 237 षटकार
4. किरॉन पोलार्ड (मुंबई इंडियन्स) 189 सामने 223 षटकार
5. रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स) 200 सामने 210 षटकार
6. महेंद्रसिंग धोनी (चेन्नई सुपर किंग्ज) 222 सामने 209 षटकार
केवळ 6 खेळाडूंनी लगावले 200 हून अधिक षटकार…
आयपीएलच्या इतिहासात केवळ सहा खेळाडू आहेत ज्यांनी या स्पर्धेत कोणत्याही एका संघासाठी 200 हून अधिक षटकार मारले आहेत. या यादीत फक्त गेल, डिव्हिलियर्स, कोहली, किरॉन पोलार्ड, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश आहे. त्याचबरोबर कोहलीला आणखी एक इतिहास रचण्याची संधी असेल. कोहली गेलला मागे टाकण्यात यशस्वी ठरला तर एका संघाकडून खेळताना 240 षटकार मारणारा तो जगातील एकमेव फलंदाज ठरेल.