Royal Challengers Bangalore, Virat Kohli :- आयपीएल 2024 चा हंगाम सुरू होण्यासाठी फक्त 4 दिवस बाकी आहेत. मात्र, सर्व संघांच्या खेळाडूंनी सराव सुरू केला आहे. या मोसमातील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. उभय संघांमधील सामना 22 मार्च रोजी एन. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल.
इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी मुलाच्या जन्मासाठी परदेशात गेलेला विराट कोहली भारतात परतला. आयपीएलसाठी लवकरच तो रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघात दाखल होईल. मात्र, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विराट कोहलीशिवाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे इतर खेळाडू सराव करताना दिसत आहेत.
Virat at Chinnaswamy Stadium ❤️✨ practicing with the team today. #ViratKohli #RCB pic.twitter.com/itOm38qZoC
— P ✨ (@ssnoozee_) March 18, 2024
या व्हिडिओमध्ये विराट कोहली आणि कॅमेरून ग्रीन व्यतिरिक्त रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे इतर खेळाडू दिसत आहेत. वास्तविक, यावेळी एन. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे खेळाडू घाम गाळत आहेत. तसेच विराट कोहली सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. खरंतर विराट कोहली बऱ्याच कालावधीनंतर मैदानात परतला आहे.
इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका कोहली खेळणार होता. सलामीच्या सामन्यासाठी तो हैदराबादमध्ये दाखलही झाला होता; परंतु अचानक त्याने माघार घेतली. वैयक्तिक कारणासाठी कोहली माघार घेत असल्याचे बीसीसीआयने जाहीर केले होते. त्यामुळे कोहलीने नेमकी कशामुळे माघार घेतली हे कारण गुलदस्तातच होते. कोहलीने आपल्याला पुत्ररत्न झाल्याचे जाहीर केले. मुलाच्या जन्मानंतरही तो लंडनमध्येच होता. रविवारी सकाळी तो मुंबईत दाखल झाला. प्रदीर्घ कालावधीनंतर कोहली क्रिकेटच्या मैदानात पुन्हा दिसणार आहे.
Daddy’s Home and he is ready to reign again! 👑
Virat Kohli checked in to Namma Bengaluru, and we can’t keep calm. Happy #Homecoming, @imVkohli! ❤🔥🏡#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2024 pic.twitter.com/KLWKz788wx
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 18, 2024
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ – अनुज रावत, दिनेश कार्तिक, फाफ डू प्लेसिस, फिन ऍलन, विराट कोहली, रजत पाटीदार, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक, वानिंदू हसरंगा, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, सोनू यादव, मनोज भंडागे, आकाश दीप, जोश हेझलवूड, सिद्धार्थ कौल, महंमद सिराज, हर्षल पटेल, कर्ण शर्मा, डेव्हिड विली, अविनाश सिंग, राजन कुमार, रीस टोपली, हिमांशू शर्मा.