IPL 2024 (PBKS vs MI Match 33) : आयपीएल 2024 चा 33 वा सामना आज (17 एप्रिल,गुरुवार) पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवला जाईल. या सामन्यात दोन्ही संघ महाराजा यादविंदर सिंग इंटरनॅशनल स्टेडियम, चंदिगड येथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता आमनेसामने येतील.
आयपीएल 2024 मध्ये घरच्या वानखेडे मैदानावर सलग 4 सामने खेळल्यानंतर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई संघ आता पंजाब किंग्जचे आव्हान मोडून काढण्यासाठी मोहालीत पोचला आहे. हा सामना गुणतालिकेतील फरकासाठी आणि प्लेऑफसच्या स्पर्धेसाठी अत्यंत महत्वाचा आहे.
मुंबई संघाने आतापर्यंत 5 वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. असे असले तरी पंजाबचा संघही काही कमी नाही. या दोन संघांमधील हेड टू हेड आकडेवारीचा विचार केल्यास जास्त फरक दिसत नाही. कारण, या स्पर्धेत पंजाब आणि मुंबई यांच्यात 31 सामने खेळले गेले आहेत. यापैकी पंजाबने 15 तर मुंबईने 16 सामने जिंकले आहेत. म्हणजे स्पर्धा जवळपास बरोबरीची झाली आहे. पंजाबचा संघाला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळू शकतो. पंजाबची मुंबई इंडियन्सविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या 230 आहे, तर पंजाबनेही मुंबईविरुद्ध 223 धावांची सर्वोच्च धावसंख्या केली आहे.
मोहालीच्या महाराज यादवेंद्र सिंह क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत तीन सामने खेळले गेले आहेत. यातील एक सामना दिवसा आणि दोन सायंकाळी झाले आहेत. उद्याचा सामनाही संध्याकाळी होणार आहे. विशेष म्हणजे सायंकाळी झालेल्या दोन सामन्यांत पंजाबचा पराभव झालेला आहे. प्रथम त्यांना सनरायझर्स हैदराबादने 2 धावांनी पराभूत केले, त्यानंतर राजस्थान रॉयल्सने त्यांचा 3 विकेट्सने पराभव केला होता.
IPL 2024 (GT vs DC Match 32) : गुजरात टायटन्सचा दारूण पराभव, दिल्लीनं 6 गडी राखून मिळवला विजय…
वेगवान गोलंदाजांना मदत होणार
येथील खेळपट्टी अतिशय वेगवान मानली जाते. किंवा ती भारतातील सर्वात वेगवान खेळपट्ट्यांपैकी एक आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. हे स्टेडियम आणि मैदान नवीन आहे, त्यामुळे वेगवान गोलंदाजांना येथे मदत मिळते. पण इथे जास्त स्कोअरिंग मॅच होईल अशी अपेक्षाही धुसर आहे. विजयासाठी 170 ते 180 धावाच पुरेशा असतील. मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंना थोडीफार मदत मिळेल, पण विजय-पराजय यातील फरक वेगवान गोलंदाज ठरवतील, असे दिसते.