IPL 2024 (LSG vs CSK Match 34) : केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी लखनौ सुपर जायंट्ससाठी चमकदार कामगिरी केली. या दोन्ही खेळाडूंनी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध शतकी भागीदारी केली होती. यासह राहुल आणि डी कॉकने स्वतःचाच विक्रम मोडीत काढला. महत्त्वाची बाब म्हणजे या सामन्यात लखनौने चेन्नईचा 8 विकेटने पराभव केला. राहुलने 82 धावांची खेळी केली. डी कॉकनेही अर्धशतक झळकावले.
वास्तविक, सीएसकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या लखनऊ संघासाठी राहुल आणि डी कॉक सलामीला आले. यादरम्यान दोघांमध्ये 134 धावांची भागीदारी झाली. चेन्नईविरुद्धच्या सर्वात मोठ्या सलामीच्या भागीदारीचा विक्रम रहाणे आणि शेन वॉटसनच्या नावावर आहे. या दोघांनी 2015 मध्ये राजस्थानकडून खेळताना 144 धावांची भागीदारी केली होती. राहुल-डी कॉकची भागीदारी तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2021 मध्ये दिल्लीकडून खेळताना धवन आणि पृथ्वी शॉ यांनी 138 धावांची भागीदारी केली होती.
चेन्नईविरुद्धच्या सर्वात मोठ्या सलामीच्या भागीदारीच्या बाबतीत राहुल-डी कॉकने धवन आणि वॉर्नरच्या जोडीला मागे टाकले आहे. 2014 मध्ये हैदराबादकडून खेळताना धवन आणि वॉर्नरने 116 धावांची भागीदारी केली होती.
आयपीएलमध्ये सीएसकेविरुद्धची सर्वात मोठी सलामीची भागीदारी –
144 – अजिंक्य रहाणे आणि शेन वॉटसन (RR), अहमदाबाद, 2015
138 – शिखर धवन आणि पृथ्वी शॉ (DC), मुंबई , 2021
134 – केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक (LSG), लखनौ, 2024
127 – ग्रॅम स्मिथ आणि स्वप्नील अस्नोडकर (RR), चेन्नई, 2008
116* – क्विंटन डी कॉक आणि इशान किशन (MI), शारजाह, 2020
116 – डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवन (SRH), रांची, 2014
आयपीएल 2024 च्या गुणतालिकेत लखनौ सुपर जायंट्स 5व्या क्रमांकावर आहे. त्यांनी आतापर्यंत 7 सामने खेळले असून या कालावधीत 4 जिंकले आहेत. त्यांना 3 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. लखनौला राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांनी पराभूत केले.