Indian Premier League 2024 (Live Cricket Score, CSK vs LSG) : आज, आयपीएल 2024 च्या 39 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होत आहे. या सामन्यास चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सुरूवात होईल.
गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स आज (मंगळवारी) चेपॉक स्टेडियमवर आमने-सामने असतील, तेव्हा मागील पराभवाचा बदला घेण्याचे आणि गुणतालिकेत आपले स्थान सुधारण्याचे चेन्नईचे लक्ष्य असेल. कारण, या मोसमातील (IPL 2024) शेवटच्या सामन्यात लखनौने चेन्नईचा 8 गडी राखून पराभव केला होता. हा सामना 19 एप्रिल रोजी लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळला गेला होता.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा (Toss Update) कौल हा लखनौ सुपर जायंट्स संघाच्या बाजूनं लागला आहे. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने चेन्नईविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ( Lucknow Super Giants Won the Toss & elected to Field) त्यामुळं चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरतील.
🚨 Toss Update 🚨
Lucknow Super Giants elect to bowl against Chennai Super Kings.
Follow the Match ▶️ https://t.co/MWcsF5F8yE#TATAIPL | #CSKvLSG pic.twitter.com/hJNWN7OzOV
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2024
चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील हेड टू हेड आकडेवारीबद्दल बोलायचे तर, दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 4 आयपीएल सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये लखनौने 2 सामने जिंकले असून चेन्नईने एक सामना जिंकला आहे, तर एका सामन्याचा निकाल जाहीर होऊ शकला नाही. म्हणजेच बघितले तर लखनौचा संघ चेन्नईवर भारी पडत असल्याचे दिसते.
IPL : सुरेश रैनाने IPL चॅम्पियन न झालेल्या संघांचा केला पर्दाफाश, म्हणाला “जे संघ पार्टी करण्यावर….”
या मोसमात 7 पैकी 4-4 सामने जिंकून सीएसके चौथ्या आणि लखनौ पाचव्या स्थानावर आहे. हा सामना जिंकून दोन्ही संघांना प्लेऑफच्या शर्यतीत आणखी पुढे जायचे आहे. अशा स्थितीत दोघांमध्ये आज चुरशीची स्पर्धा पाहायला मिळेल.