IPL : सुरेश रैनाने IPL चॅम्पियन न झालेल्या संघांचा केला पर्दाफाश, म्हणाला “जे संघ पार्टी करण्यावर….”

Suresh Raina : सुरेश रैना अनेक वर्षे आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता, मात्र त्याने आता क्रिकेट सोडले आहे. चेन्नई सुपर किंग्जचा भाग असताना रैनाने 4 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. आता ‘मिस्टर आयपीएल’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या सुरेश रैनाने इंडियन प्रीमियर लीगमध्ये जे संघ आजपर्यंत चॅम्पियन बनू शकले नाहीत, त्यांच्यावर टीका केली आहे. पंजाब किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स हे तीन संघ आहेत जे 2008 पासून आयपीएलचा भाग असूनही कधीही चॅम्पियन बनले नाहीत. रैनाच्या मते, जे संघ पार्टी करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करतात ते कधीही चॅम्पियन होऊ शकत नाहीत.
चॅम्पियन बनू न शकलेल्या संघांवर निशाणा साधताना सुरेश रैनाने एका मुलाखतीत सांगितले की, “चेन्नईच्या खेळाडूंनी कधीही पार्टी केली नाही, त्यामुळेच हा संघ सर्वाधिक यशस्वी ठरला आहे. पार्टी करणाऱ्या 2-3 संघांनी आयपीएलचे विजेतेपद जिंकलेले नाही. असे अनेक संघ आहेत ज्यांनी जेतेपद पटकावले नाही, त्यांनी नक्कीच मोठ्या पार्ट्या केल्या असतील. CSK ने असे केले नाही, त्यामुळेच आम्ही 5 वेळा IPL चॅम्पियन आणि 2 वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकू शकलो. मुंबई इंडियन्सनेही 5 ट्रॉफी जिंकल्या आहेत.
बीसीसीआयने पार्ट्यांवर घातली होती बंदी…
रैनाने त्या काळाबद्दलही सांगितले जेव्हा इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारे खेळाडू सेलिब्रिटींसोबत खुलेआम हँग आउट करायचे आणि तिथे खूप पार्टी व्हायची. पण बीसीसीआयने या पार्ट्यांसाठी नवा नियम जेव्हा केला तेव्हा मुंबई इंडियन्सच्या एका चीअरलीडरने ब्लॉगच्या माध्यमातून काही क्रिकेटपटूंवर निशाणा साधला आणि म्हटले की चीअरलीडर्सना आदराने पाहिले जात नाही. या घटनेनंतर बीसीसीआयने आयपीएलमधील ‘पार्टी कल्चर’वर बंदी घातली होती, जेणेकरून चीअरलीडर्स आणि डान्सर्सना सुरक्षित वाटावे.





