CSK MS Dhoni in IPL 2024 : महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा मैदानात खेळताना दिसणार आहे. धोनीला इंडियन प्रीमियर लीग 2024 साठी चेन्नई सुपर किंग्जने कायम ठेवले आहे. याआधी धोनीबाबत अनेक प्रकारचे अंदाज बांधले जात होते. आयपीएल 2023 नंतर चाहत्यांना त्याच्याबद्दल प्रश्न पडले होते. मात्र कायम ठेवल्यानंतर सर्वांनाच उत्तर मिळाले. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने धोनीच्या भविष्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
धोनी पुढील तीन हंगामात खेळू शकतो, अशी भविष्यवाणी (विश्वास) डिव्हिलियर्सने केली आहे. इंडिया टुडेच्या बातमीनुसार, तो म्हणाला, “रिटेन्शन लिस्टमध्ये त्याचे नाव पाहून मला खूप आनंद झाला आहे.” गेल्या सीझनच्या समाप्तीनंतर त्याच्याबद्दल अनेक प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. तो 2024 मध्ये मैदानात उतरेल. तो नेहमी आश्चर्यचकित करतो. तो पुढील तीन मोसमात देखील खेळणार.”
दरम्यान, धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने गेल्या वेळी विजेतेपद पटकावले होते. सीएसकेनं अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा पराभव केला. धोनीच्या फलंदाजीसाठी मागचा हंगाम काही खास नव्हता. पण त्याचे कर्णधारपद नेहमीच संघासाठी महत्त्वाचे राहिले आहे. धोनीने गेल्या मोसमात 16 सामने खेळले. या कालावधीत 104 धावा त्याने केल्या. या काळात त्याची सर्वोत्तम धावसंख्या म्हणजे नाबाद 32 धावा. धोनीने 2022 मध्ये 14 सामन्यात 232 धावा केल्या होत्या.
धोनीच्या एकूण कारकिर्दीवर नजर टाकली तर तो प्रभावी ठरला आहे. त्याने आयपीएलमध्ये 5 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. धोनीने 250 सामने खेळले आहेत. या कालावधीत 5,082 धावा केल्या आहेत. धोनीने या फॉरमॅटमध्ये 24 अर्धशतके झळकावली आहेत. नाबाद 84 धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. IPL 2008 मध्ये धोनीनं पदार्पण केले होते. यामध्ये त्याने 16 सामने खेळले आणि 414 धावा केल्या. या काळात दोन अर्धशतके झळकावली होती.