चेन्नई – आयपीएल 2023 चा हंगाम आता रोमांचक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. प्ले ऑफ मध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी प्रत्येक संघ आपले सर्वस्व पणाला लावत आहे. आजचा सामना हा चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईटस रायडर असा रंगणार असून हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियम वर खेळवला जाणार आहे.
चेन्नई आणि कोलकाता हे दोघेही दुसऱ्यांदा आमने सामने येणार आहेत. पहिल्या सामन्यावर कोलकाताला चेन्नईने पराभूत केले होते. त्यामुळे कोलकाता आपल्या पराभवाचा वचपा काढणार का? हे बघणे महत्वाचे ठरेल. आयपीएलमध्ये आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ 27 वेळा आमनेसामने आले आहेत.
ज्यामध्ये चेन्नईने 18 आणि केकेआरने केवळ 9 वेळा विजय मिळवला आहे. एमए चिदंबरम स्टेडियमवर दोन्ही संघ 9 वेळा एकमेकांविरुद्ध भिडले आहेत, ज्यामध्ये चेन्नईने 7 तर कोलकाताने फक्त 2 सामने जिंकले आहेत. अश्यातच आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे रहाणार आहे.
चेन्नई सुपर किंग्ज –
डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), दीपक चहर, महिष तीक्षणा, तुषार देशपांडे.
कोलकाता नाइट रायडर्स –
जेसन रॉय, रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, नितीश राणा (कर्णधार), आंद्रे रसल, रिंकू सिंग, शार्दुल ठाकूर, सुनील नरेन, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.