नवी दिल्ली – अर्जुन तेंडुलकरने आज आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. तब्बल दोन वर्षे वाट पाहिल्यावर अर्जुनला अखेर आज संधी मिळाली. आज मुंबई इंडियन्सचा संघ कोलकाता नाईट रायडर्सच्या संघासमोर आहे. दरम्यान, मुंबईच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा खेळताना दिसला नाही. रोहितची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्याच्या जागी आज सूर्यकुमार यादवकडे संघाचे कर्णधारपद देण्यात आलं.
आजच्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने संघात काही मोठे बदल केले. मुंबईने आज ‘अर्जुन सचिन तेंडुलकर’ याला संधी दिली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातून अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये पदार्पण केल्याचं दिसून आलं. देशभरातील सर्वच क्रिकेटप्रेमींचे याकडे लक्ष लागले होते.
That moment when #ArjunTendulkar received his@mipaltan cap from #RohitSharma𓃵 pic.twitter.com/zmrstTtBPh
— Smriti Sharma (@SmritiSharma_) April 16, 2023
दरम्यान, संघात सामील करून घेताना रोहित शर्माने अर्जुनला डेब्यू कॅप दिली त्यावेळी तो भावूक झालेला दिसून आला. रोहित शर्माने त्याला कॅप दिल्यानंतर अर्जुनने त्याला मिठी मारली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी देखील यावर कमेंट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आजच्या या सामन्यात अर्जुनने मुंबईकडून पहिली ओव्हर टाकली यामध्ये त्याने 5 धावा दिल्या.