मुंबई – ख्रिस मॉरिसची भेदक गोलंदाजी आणि संजू सॅमसनची दमदार फलंदाजी यामुळे राजस्थान रॉयल्स संघाने इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायजर्स संघावर ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या कोलकाता संघाला निर्धारित २० षटकांत ९ बाद १३३ धावांपर्यंतच मजल मारता आली. यामध्ये राहुल त्रिपाठीने सर्वाधिक ३६ धावा केल्या. तर दिनेश कार्तिकने २५ आणि नितीश राणाने २२ धावांचे योगदान दिले. ख्रिस मॉरिसने २३ धावांच्या मोबदल्यात ४ विकेट घेतल्या.
प्रत्युत्तर राजस्थान रॉयल्स संघाने १८.५ षटकांत ४ बाद १३४ धावा करून विजयावर शिक्कामोर्तब केला. यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे यांनी प्रत्येकी २२ धावा केल्या असून डेविड मिलरने नाबाद २४ धावा केल्या. तर संजू सॅमसनने ४१ चेंडूंत २ चौकार आणि १ षटकारासह नाबाद ४२ धावा करून राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
कोलकाताकडून वरुण चक्रवर्तीने दोन विकेट घेतल्या. तर शिवम मावी आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.