वॉशिग्टन – कोविड-19 च्या प्रतिबधासाठी जॉन्सन ऍन्ड जॉन्सन या कंपनीने तयार केलेल्या लसीच्या वापरावर गेल्या 11 दिवसांपूर्वी घातलेली स्थगिती अमेरिकेने उठवली आहे. इतर लसीप्रमाणे या लसीचे दोन डोस ऐवजी एकच डोस घेणे अपेक्षित आहे.
मात्र लस घेतल्यानंतर काही रुग्णांच्या रक्तात गुठळ्या तयार होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे या लसीच्या वापरावर स्थगिती घालण्यात आली होती. आतापर्यंत 80 लाख व्यक्तींना जॉन्सन ऍन्ड जॉन्सनची लस देण्यात आली आहे. त्यापैकी केवळ 15 व्यक्तीना रक्तात गुठळ्या होण्याचा त्रास झाला आहे.
या संभाव्य त्रासापेक्षा लसीमुळे होत असलेला लाभ अधिक महत्वाचा असल्याचा निष्कर्श संशोधकांनी काढल्यामुळे या लसीच्या वापरावरील स्थगिती उठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
रक्तात गुठळ्या होण्याचा त्रोस झालेल्या सर्व 50 वर्षांखालील महिला होत्या. त्यापैकी तिघींचा मृत्यू झाला असून सात जणींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र जॉन्सन ऍन्ड जॉन्सनची लस करोनाविरोधी लढ्यासाठी उपकारक असल्याचा निर्वाळा संशोधकांनी काढला.
रक्तात गुठळ्या येण्याची शक्यता तरुण महिलांना आयोदरच लक्षात आणून द्यावी आणि पर्यायी लस घेण्याचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवण्यात यावा, असे संशोधकांनी सुचवले.