IPL 2021 : रोमांचक लढतीत पंजाबचा विजय

शारजा  -शारजाच्या मैदानावर झालेल्या रोमांचक सामन्यात पंजाबने हैदराबादवर 5 धावांनी विजय मिळविला. पंजाबने दिलेल्या 126 धावांचा पाठलाग करताना हैदराबादला 20 षटकांत 7 बाद 120 धावांपर्यत मजल मारता आली.

निर्धारित धावांचा पाठलाग करताना हैदराबादचीही सुरुवात निराशाजनक ठरली. सलामीवीर डेविड वॉर्नर, कर्णधार केन विल्यमसन आणि मनिष पांडे झटपट बाद झाल्याने हैदराबादची 8 षटकात 3 बाद 32 अशी अवस्था झाली.

दुसरीकडे सलामीवीर वृद्धिमान साहाने एक बाजू सांभाळत धावफलक हलता ठेवला. त्याने जसन होल्डरसोबत सहाव्या विकेटसाठी 32 धावांची निर्णायक भागीदारी केली; पण दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात वृद्धिमान साहा 31 धावांवर बाद झाला.

यानंतर जसन होल्डरने आक्रमक फलंदाजी करत 29 चेंडूत 5 षटकार खेचत नाबाद 47 धावांची खेळी केली. परंतु ही खेळी विजयासाठी अपुरी ठरली. पंजाबकडून रवी बिष्णोईने 3, महम्मद शमीने 2, तर अर्शदिप सिंगने 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी, सलामीवीर केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांना हैदराबादविरुद्ध मोठी भागीदारी करता आली नाही. जेसन होल्डरने चौथ्या षटकांत दोघांना बाद केल्याने पंजाबची पाच षटकात 2 बाद 27 धावा अशी अवस्था झाली. यानंतर ख्रिस गेल आणि एडन मार्कराम यांनी 10 व्या षटकात पंजाबचे अर्धशतक पूर्ण केले.

11व्या षटकात हैदराबादचा फिरकीपटू राशिद खानने गेलला पायचित पकडले. गेलला 14 धावा करता आल्या. त्यानंतर 17व्या षटकात पंजाबने शतक पूर्ण केले. शेवटच्या षटकातही पंजाबला आपली धावगती वाढवता न आल्याने निर्धारित 20 षटकात त्यांना 7 बाद 125 धावा करता आल्या. हैदराबादकडून होल्डरने सर्वाधिक 3 गडी बाद केले.

: आजचे सामने 

चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
दुपारी : 3ः30
ठिकाण ः अबुधाबी
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्‌स 1

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
विरुद्ध मुंबई इंडियन्स
सायंकाळी : 7ः30
ठिकाण ः दुबई
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्‌स 1

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.