भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये तरुणांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या टोळीत सामील असलेली तरुणी मुलांना तिच्या रिकाम्या फ्लॅटवर बोलावत असे. आणि तिच्या साथीदाराच्या मदतीने बनावट छापा टाकून तरुणांची लूट करीत होती. भोपाळच्या अयोध्या नगर पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून, तिला अटक करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस अधीक्षक संजय साहू यांनी सांगितले की, मध्य प्रदेशातील विष्णू मीणा यांचे दोन मित्र, हेम सिंग आणि मोहित डांगी यांच्यासोबत 26 डिसेंबर रोजी भोपाळ येथे गाडीचे टायर बदलण्यासाठी गेले होते. विष्णूच्या मित्राने निशातपुरा येथे राहणाऱ्या त्याच्या ओळखीच्या मैत्रिणीला फोन केला होता. मुलीने तिन्ही तरुणांना भाड्याच्या फ्लॅटवर बोलावले.
फ्लॅटमध्ये तिघे पोहोचताच चहा बनवण्याच्या बहाण्याने तरूणी खोलीच्या बाहेर गेली. त्याचवेळी तीन अनोळखी फ्लॅटमध्ये आले. या तीन अनोळखी तरुणांनाही स्वत: ची ओळख सीआयडी अधिकारी असल्याची बतावणी करून तरुणांकडून 80 हजार रुपये लुटले. तसेच त्यांच्या मोबाईलमधून तीन हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले.
पोलिसांनी केलेल्या तपासात या तरुणीने अनेकांच्या फसवल्याची माहिती समोर आली आहे. तरुणीला अटक झाली असून, अन्य आरोपीचा शोध सुरु आहे.