#पुणे: ग्रामीण भागातही ऑनलाइन ‘बनवाबनवी’चे लोण

ऑनलाइन दणका : फसवणुकीचे प्रमाण वाढता वाढे

कामशेत – सध्याच्या डिजीटल युगात जगभरात मोबाइल, ई-कॉमर्स वेबसाईटचा वापर झपाट्याने वाढत आहे. हल्ली लोकांना खाण्या-पिण्याच्या वस्तूंपासून ते सर्वच काही ऑनलाइन घरपोच अगदी सहज मिळू लागले आहे. पण वाढत्या वापरामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातही ऑनलाइन गंडा घालण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.

ऑनलाइन संकेतस्थळावर घरकाम करण्यासाठी नोकरी देण्यात येईल, अशी जाहिरात देऊन जाहिरातींच्या आधारे नोकरी देण्याचे आमिष देऊन आर्थिक फसवणूक करण्यात येत आहे. हे लोण सध्या ग्रामीण भागातही वाढले आहे.

बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत तुमचे खाते आहे. तुमचे एटीएम बंद पडले आहे, ते सुरू करायचे आहे, असे सांगत एटीएमविषयी सर्व माहिती घेण्यात आली. तुमचे एटीएम कार्ड खराब झाले आहे. ते सुरू करण्यासाठी तुमचा एटीएम नंबर व अन्य माहिती घेत तिच्या खात्यातून काही वेळात पैसे काढून घेतले. याबाबत त्यांनी पोलिसांत अज्ञात व्यक्‍ती विरोधात फिर्यादही दाखल केली; मात्र अशा घटनांवर आळा बसणार तरी कधी असा सवाल ग्रामीण भागातील तरुणांमधून विचारला जात आहे.

घरकाम करण्यासाठी पूर्णवेळ विश्‍वासू नोकरी देणे, परदेशात चांगल्या कंपनीत तुमची निवड झाली आहे. तुम्हाला लॉटरी लागली आहे, यांसारखी आमिषे दाखवून राज्यातील शेकडो तरुण, तरुणी, नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. याचे लोण आता ग्रामीण भागात आल्यामुळे तरूण-तरूणी याला बळी पडताना दिसून येत आहे.

सध्या बेरोजगारांचे प्रमाणही वाढले आहे. तसेच नोकरीच्या शोधात असलेले तरुण-तरुणी आर्थिक फायद्याच्या भावनेत अशा आमिषांना बळी पडत आहेत. त्यातून गुंतवणुकीचा निर्णय घेतात, मात्र त्यात त्यांची फसवणूक होते. अशा अमिषांना बळी पडून पैसे गुंतवणूक करू नका, असे आवाहनही पोलिसांकडून केले जाते, मात्र यावर कायमचा उपाययोजना करणे गरजेचे आहे; अन्यथा हा फसवणुकीचा आलेख ग्रामीण भागात वाढल्याशिवाय राहणार नाही.

जागो ग्राहक जागो
ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटस्‌ ग्राहकांना खूपच भावल्या आहेत. एका क्‍लिकसरशी तुम्ही दिलेल्या पत्त्यांपर्यंत विविध वस्तू आणि सुविधा तुम्हाला मिळत आहेत. त्यामुळे ग्राहकही या ऑनलाइन सुविधांना प्राधान्य देत असतात. परंतु सध्या वाढलेल्या ऑनलाइन सुविधांसोबत ऑनलाइन फसवणुकीच्या प्रमाणातही वाढ झालेली दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना स्वतःला “जागो ग्राहक जागो’ असे म्हणून घेण्याची वेळ आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.