Supriya Sule – राष्ट्रवादी पक्षाची स्थापना कुणी केली? पक्ष कुणाचा आहे? हे सर्वांना माहिती आहे की पक्ष कुणाचा आहे. मला निवडणूक आयोगावर पूर्ण विश्वास आहे. परंतू आता कुठेतरी भिती वाटत आहे.
कारण, त्यांच्या मागे केंद्रातील अदृश्य शक्ती आहे. तर त्यांना आताच कसं काय माहिती चिन्ह आणि पक्ष त्यांना मिळणार आहे, असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केले.
सोलापूर येथे राष्ट्रवादीत बंड करून सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार यांच्या बंडाबाबत सुप्रिया सुळे यांनी सूचक वक्तव्य केले. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ही अदृश्य शक्ती कोण याबाबत उघड-उघड यासाठी बोलत नाही कारण, आमच्याकडे पुरावे नाहीत.
मात्र यामागे दिल्लीतील अदृश्य शक्ती नक्कीच आहे. एवढे मात्र खरे. ती मग महाराष्ट्राच्या विरोधात काम करते. यामध्ये शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल आणि देवेंद्र फडणवीस असतील या तिघांबाबत तीच शक्ती काम करते, असेही त्यांनी सांगितले.
तसेच खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मालेगावमध्ये दाखल करण्यात आलेलया मानहानी दाव्याबाबत त्या म्हणाल्या की, विरोधातील लोकांवर आयसीई (ICE) केले जाते.
म्हणजे ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्सची कारवाई केली जाते. यात काही नवीन नाही. अशीच परिस्थिती देशात आणि राज्यात असल्याचे म्हणत भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.