आंतरराष्ट्रीय प्रकाश यात्रेचे पिंपरीत उत्साहात स्वागत

शीख बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग
पिंपरी: शीख धर्मगुरू गुरूनानक यांच्या 550 व्या जयंती उत्सवाचे औचित्य साधुन पाकिस्तान येथील ननकाना साहेब गुरूद्वारापासून निघालेल्या आंतरराष्ट्रीय प्रकाश यात्रेचे (नगर कीर्तन) शनिवारी (दि. 21) शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यामध्ये शीख बांधव उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

या प्रकाश यात्रेला 1 ऑगस्टपासून सुरवात झाली आहे. देशातील विविध भागातून जात ही यात्रा आज पिंपरी येथे पोहचली. पिंपरीतील श्री गुरूनानक दरबार येथे शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समितीच्या वतीने यात्रेचे स्वागत करण्यात आले. फुलांची उधळण करण्यात आली. यात्रेत सहभागी असलेल्या रथामध्ये गुरू ग्रंथसाहेब, गुरूनानकजी यांचे खडाव आणि गुरू गोविंदसिंग यांचे कृपाण ठेवले होते. त्यांचे दर्शन घेण्यासाठी शीख बांधवांनी एकच गर्दी केली होती. उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केलेली होती.

समितीचे अध्यक्ष सुरेंद्रसिंग आदिवाल, मीनू गील, सज्जनसिंग कालो, गुरूविंदरसिंग गील, गुरूचरणसिंग गील, मनजितसिंग संधू, अमरसिंग गील, चरणजितसिंग मक्कड, सरबजितसिंग, मन्ना पाजी आदी उपस्थित होते. ही प्रकाश यात्रा त्यानंतर देहूरोडसाठी रवाना झाली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×