नवी दिल्ली – विमा व्यवसाय नियंत्रक इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने विमा कंपन्यांना 10 जुलैपर्यंत करोनावर विमा पॉलिसी जारी करण्याच्या सूचना केल्या आहेत.
या पॉलिसींचे नाव कंपन्यांच्या नावाबरोबर करोना कवच पॉलिसी आणि करोना रक्षक पॉलिसी असे असणार आहे.
या पॉलिसी सिंगल प्रीमियमच्या असणार असून त्यांचा कालावधी साडेतीन महिने ते साडेनऊ महिन्यांपर्यंतचा असणार आहे. यासाठीची वयोमर्यादा किमान 18 वर्ष ते 65 वर्षांपेक्षा कमी नसावी असे सांगण्यात आले आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये करोनाचा मुकाबला करताना नागरिकांना अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या पॉलिसी उपलब्ध झाल्यानंतर नागरिकांची सोय
होणार आहे.