Instagram Update : इंस्टाग्राम हे ॲप दिवसेंदिवस खूपच लोकप्रिय होत चालल आहे. फेसबुक,ट्विटर अशा महत्वाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनंतर येऊन देखील इन्स्टा तरुणाईमध्ये अधिक लोकप्रिय आहे. अशात इंस्टाने आता नवीन आणलेल्या एका फीचरचा चॅटिंग करणाऱ्या तरुणाईला भलताच फायदा होणार आहे. | Instagram Update msg edit
मेटा-मालकीच्या सोशल मीडिया ॲप इंस्टाग्रामने एक नवीन आणि अतिशय उपयुक्त फीचर लाँच केले आहे. अनेकदा मेसेज टाईप करताना स्पेलिंग मिस्टेक झाल्यामुळे तुम्हाला तुमच्या मित्राच्या आणि मैत्रिणीच्या शिव्या खायला लागल्या असतील तर तुमच्यासाठी इंस्टाचे हे नवीन फिचर उपयोगी ठरणार आहे. कारण इंस्टाने आता तुम्ही पाठवलेला मेसेज एडिट करण्याचा पर्याय दिला आहे. ज्यामुळे तुमचे स्पेलिंग चुकले तर तुम्ही एडिट करू शकाल आणि कोणत्याही अर्थाचा अनर्थ होणार नाही. | Instagram Update msg edit
इंस्टाग्रामच्या नवीन अपडेटनंतर, डायरेक्ट मेसेज (DM) मध्ये पाठवलेले संदेश 15 मिनिटांसाठी एडिट केले जाऊ शकतात. जर तुम्ही 15 मिनिटांसाठी मेसेज एडिट केला नाही, तर तुम्ही त्यानंतर त्यात बदल करू शकणार नाही. हे फीचर सुरू होण्यापूर्वी फक्त टायपिंग किंवा चुकून पाठवलेले मेसेज डिलीट करण्याचा पर्याय होता. | Instagram Update msg edit
इंस्टाग्रामवर पाठवलेले संदेश कसा एडिट कराल ?
हे फिचर वापरण्यापूर्वी तुमचे Instagram ॲप अपडेट करा.
तुम्हाला एडिट करायचा असलेला मेसेजवर क्लिक करा आणि धरून ठेवा. त्यानंतर तुम्हाला एडिट ऑप्शन दिसेल.
त्यावर क्लिक करा आणि मेसेज एडिट करा.
असे एडिट फिचर यापूर्वी WhatsApp, X आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहे.