न्यूयॉर्क – इथिओपियाच्या तिग्रे भागात सामूहिक बलात्काराच्या पाचशेपेक्षा जास्त घटना घडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुरुषांसमोर त्यांच्या कुटुंबातील महिलांवर बलात्कार केला गेला. दरम्यान, हा आकडा पाचशेपेक्षा जास्त असू शकतो असे संयुक्त राष्ट्रसंघानेच म्हटले असल्याचे या प्रकाराचे गांभीर्य वाढले आहे.
इथिओपियातील यूएनच्या समन्वयक वाफा यांनी न्यूयॉर्कमध्ये सांगितले की, सशस्त्र पुरूषांनी शस्त्रांचा धाक दाखवत बलात्कार केल्याचे पीडित महिलांनी म्हटले आहे. अनेक महिलांनी सामूहिक बलात्कार, कुटुंबातील सदस्यांसमोर बलात्कार आणि जिवे मारण्याची धमकी देऊन कुटुंबातील सदस्यांसमोर बलात्काराची कहाणीही सांगितली आहे. ते म्हणाले की एकट्या वैद्यकीय सुविधा केंद्रांवर बलात्काराची 516 प्रकरणे समोर आली आहेत.
वाफा म्हणाले की, बलात्काराच्या घटनेमुळे बदनामी होईल या भीतीने अनेक महिला समोर देखील आलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत वास्तविक संख्या यापेक्षा अधिक असू शकते असा अंदाज आहे. सोमवारी संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत तिगरे येथील लोकांवर होणारा गोळीबार आणि बलात्कार लक्ष्यित हल्ले संपवण्याची मागणी केली गेली.
संयुक्त राष्ट्रांनी अत्याचारांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्याचवेळी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी हे एखाद्या समुदायाला नष्ट करण्याचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. पण इथिओपियाने ब्लिंकेनचे हे आरोप फेटाळून लावले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार तिगरे येथे राहणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की ही लूट आणि अत्याचार शेजारील देश इरिट्रियाच्या सैनिकांनी केले आहेत. ते म्हणाले की, इरिट्रियाचे सैनिक दररोज त्यांची घरे जाळत आहेत. त्यांच्या महिलांवर सामूहिक बलात्कार केले जात असून पिकांना आग लावल्या जात आहेत.