पुणे – सण, उत्सव आणि सार्वजनिक कार्यक्रमांबरोबर च व्यक्तीगत कार्याला सुद्धा सामाजिक दिशा देण्याचे काम गेल्या पंधरा वर्षांपासून दक्षिण उपनगरां मध्ये करणारे अँड दिलीप जगताप यांनी आपला षष्ठब्धीपुर्ती(61 वा वाढदिवस) सोहळा वंचित व उपेक्षितांना मदत देऊन साजरा केला.
कात्रज येथील सावंत विहार पेज तीन सोसायटी मध्ये राहणारे अँड दिलीप जगताप यांनी सावंत विहार परिसरातील अनेक सोसायट्यांना एकत्र करून एक सोसायटी समूह स्थापन केला. त्या अनुषंगाने सामाजिक उपक्रमांना एक दिशा दिली.
सोसायट्यांमध्ये सामाजिक ऐक्यातून सौदार्य निर्मिती करण्या चा प्रयत्न केला. त्याचाच एक भाग म्हणून अनाठायी खर्च करण्याची परंपरा मोडीत काढण्यासाठी दक्षिण उपनगरां मधील कात्रज परिसरातील वृद्धाश्रम आणि वंचित घटकां समवेत वाढदिवस साजरा करण्याचा पहिला प्रयोग केला. या माध्यमातून दक्षिण उपनगरांमधील ममता फौंडेशन, सुमती बाल भवन, जनसेवा फौंडेशन, माय माउली केअर सेंटर, अक्षर स्पर्श शाळा अशा अनेक सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना आर्थिक पाठबळ मिळवून दिले.
सावंत विहार फेज तीन सोसायटीच्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळताना पाच वर्षात सामाजिक उपक्रमांचे शतक ठोकले. याचाच एक भाग म्हणून अँड. जगताप यांनी आपला षष्ठब्धीपुर्ती सोहळा वंचित व निराधारा मुलांना सोबत साजरा केला. या वेळी अँड. जगताप यांनी ममता फौंडेशन, जनसेवा फौंडेशन व माय माउली केअर सेंटर या संस्थांना आर्थिक मदतीबरोबरच धान्य, खाऊ, शालेय साहित्यांचे वाटप व ममता फौंडेशनमधील एचआयव्ही ग्रस्त मुलांना गोड जेवण दिले.