बारामतीत आणखी दोघे पॉझिटिव्ह

सिद्धेश्‍वर निंबोडी व कोऱ्हाळेत एकास लागण

बारामती  -सिद्धेश्‍वर निंबोडी (ता. बारामती) येथील करोनाबाधितांच्या संपर्कातील 31 जणांचा चाचणी अहवाल मंगळवारी (दि. 2) आला. यात एक पॉझिटिव्ह तर 30 निगेटिव्ह आले आहेत. तर कोऱ्हाळे बुद्रुक येथील एकास करोनाची लागण झाल्याने तालुक्‍यात मंगळवारी दोघे पॉझिटिव्ह आल्याने तालुक्‍याचा एकूण आकडा 19वर गेला आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्‍टर मनोज खोमणे यांनी दिली.

सिद्धेश्‍वर निंबोडी 26 वर्षीय तरुणास तर कोऱ्हाळे बुद्रुक येथील 90 वर्षीय वृद्ध व्यक्‍तीस करोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे, त्यामुळे ग्रामीण भागातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे सिद्धेश्‍वर निंबोडीसह आता कोऱ्हाळे बुद्रुक गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

गावच्या सीमा बंद करण्यात आले असून पाच किलोमीटरचा परिसर बफर झोन म्हणून घोषित केला आहे. अत्यावश्‍यक कारणाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.