जुन्नर – जुन्नर तालुक्यात गुरुवारी (दि. 6) आठ जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात जुन्नर शहरात दोन, आळे, ओतूर, साकोरी, बेल्हे व नारायणगाव या गावांमध्ये प्रत्येकी एक असे एकूण आठ बाधित आढळून आले आहेत.
तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 498 झाली आहे. यापैकी 351 जण उपचारानंतर घरी परतले असून 126 ऍक्टिव्ह रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. दरम्यान ओझर येथील केंद्रात गुरुवारी 27 संशयितांचे स्वॅब घेण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे यांनी सांगितले.
नारायणगाव येथील रुग्णालयात 11 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांपैकी 10 पॉझिटिव्ह असून 1 संशयित आहे. गुरुवारी येथून चौघांना डिस्चार्ज देण्यात आला असून आजअखेर एकूण पाच जणांनी येथे उपचार घेत करोनाला मात दिली आहे. लेण्याद्री येथील केअर सेंटरमध्ये 70 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती डॉ. शाम बनकर यांनी दिली.