कराड – येथील कृष्णा हॉस्पिटलमधून गुरूवारी 34 जण करोनामुक्त झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामध्ये कराड तालुक्यातील वडगाव हवेली येथील 22 व 37 वर्षीय पुरूष, किवळ येथील 36 वर्षीय पुरूष, मलकापूर येथील 25 वर्षीय महिला, 42 वर्षीय महिला, 2 वर्षीय मुलगी, 31 वर्षीय पुरूष, 25 वर्षीय पुरूष,
गोंदी येथील 40 वर्षीय पुरूष, अमराग येथील 55 वर्षीय पुरूष, 34 वर्षीय पुरूष, कालवडे येथील 39 वर्षीय पुरूष, 42 वर्षीय महिला, कृष्णा हॉस्पिटल येथील 25 वर्षीय महिला, 27 वर्षीय महिला, खुबी येथील 52 वर्षीय पुरूष, कार्वे येथील 32 वर्षीय महिला, आगाशिवनगर येथील 25 वर्षीय पुरूष, नांदगाव येथील 53 वर्षीय महिला, सवादे येथील 38 वर्षीय पुरूष, ओंडोशी येथील 10 वर्षीय मुलगी, अडीच वर्षीय मुलगा, 14 वर्षीय मुलगी यांचा समावेश आहे.
पाटण तालुक्यातील जाधववाडी येथील 28 वर्षीय पुरूष, मल्हारपेठ येथील 25 वर्षीय पुरूष, मोरगिरी येथील 45 वर्षीय महिला, तळमावले येथील 50 वर्षीय महिला, पाटणमधील चव्हाण गल्लीतील 18 वर्षीय मुलगी, बांबवडे येथील 25 वर्षीय महिला, येळापूर येथील दीड वर्षीय मुलगा, 5 महिन्याचे बाळ, नेराळे-पाटण येथील 52 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. तर कोरेगाव तालुक्यातील वाठार – किरोली येथील 17 वर्षीय मुलगा, 5 वर्षीय मुलगी यांचा समावेश आहे.