भोर -भोर तालुक्यात करोनाची पिडा संपता संपत नसल्याने प्रशासनही हतबल झाले आहे. दरम्यान, रविवारी (दि. 12) पिसावरे दोघे बाधित आढळले असून सहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांनी सांगितले.
भोर तालुक्यात आतापर्यंत 75 बाधित आढळले असून 32 जणांनी करोनावर मात केली आहे. दरम्यान, भोर येथील औद्योगिक संस्थेत सुरू केलेल्या करोना केंद्रात 13 करोनाबाधितांवर उपचार दिले जात आहेत. तालुक्यात अजूनही बाधित वाढले आहेत.