विशाखापट्टणम : कर्णधार विराट कोहलीच्या भारतीय संघाला आज येथे होत असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुस-या एकदिवसीय सामन्यांत आव्हान कायम राखण्यासाठी विजय आवश्यक बनला आहे. तर, दुसरीकडे आजचा सामना जिंकून विंडीजचा मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे भारतीय संघाने संघात एक तर विंडीजने संघात दोन बदल केले आहे. तत्पूर्वी विंडीजने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण स्विकारले आहे.
भारतीय संघात कर्णधार विराट कोहलीने एक बदल केला आहे. अष्टपैलू शिवम दूबे यांच्या जागी वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. मागील सामन्यात भारतीय संघाचे गोलंदाज यांची कामगिरी अत्यंत सुमार झाली होती.
भारतीय संघ : रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शार्दुल ठाकुर, केदार जाधव, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी
A look at the Playing XI for the two teams.
One change for #TeamIndia. Shivam Dube OUT. Shardul Thakur IN.#INDVWI pic.twitter.com/jDFvEMYDkc
— BCCI (@BCCI) December 18, 2019
वेस्ट इंडिज संघाने संघात दोन बदल केले आहेत. हेडन वाॅल्श ज्युनियरच्या जागी खरी पिएरे आणि सुनिल अम्ब्रिसच्या जागी एविन लुईसचा संघात समावेश करण्यात आला आहे.
वेस्टइंडिज संघ : एविन लुईस, शाई होप, शिमरन हेटमायर, निकोलस पूरन, रॉस्टन चेज़, काईरन पोलार्ड, जेसन होल्डर, कीमो पॉल, खरी पिएरे, अल्ज़ारी जोसफ़, शेल्डन कॉट्रेल.