INDvPAK Match – एकदिवसीय विश्वचषकाच्या 12व्या सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. विश्वचषकाच्या इतिहासातील उभय संघांमधील हा आठवा सामना आहे.
View this post on Instagram
दरम्यान, भारत-पाकिस्तानमधील महामुकाबला पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी नरेंद्र मोदी स्टेडियमवर दाखल झाले आहेत. भारतात क्रिकेट आणि बॉलिवूडच खास नात आहे. भारताच्या अनेक स्टार क्रिकेटर्सनी बॉलिवूडच्या प्रसिद्ध हिरॉइन सोबत लग्न केली आहेत.
हा सामना पाहण्यासाठी आज अभिनेत्री अनुष्का शर्मा, सलमान खान, सचिन तेंडुलकर आणि प्रसिद्ध गायक अर्जित सिंह अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत. सध्या त्यांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.