World Cup 2023 India vs New Zealand Toss Update : वर्ल्ड कप 2023 मध्ये आज भारताचा सामना न्यूझीलंडशी होत आहे. या आवृत्तीचा हा 21वा सामना आहे. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. 2003 च्या विश्वचषकानंतर भारतीय संघाला या स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध कधीही विजय मिळवता आलेला नाही. 20 वर्षांनंतर टीम इंडियाला ही प्रतीक्षा संपवायची आहे.
सामना दुपारी दोन वाजता सुरू होईल.तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा भारतीय संघाच्या बाजूनं लागला आहे. कर्णधार रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.(India won the toss and elected to field)या सामन्यात हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर खेळत नसल्याचे रोहितने टॉसदरम्यान सांगितले. त्यांच्या जागी मोहम्मद शमी आणि सूर्यकुमार यादव यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर न्यूझीलंडने एकही बदल केलेला नाही.
दरम्यान, विश्वचषक 2023 स्पर्धेपासून टीम इंडियाने आयसीसी टूर्नामेंटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सहा सामने खेळले आहेत. यापैकी पाच सामने किवी संघाने जिंकले. तर, 2019 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील गट टप्प्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. याच न्यूझीलंडने 2019 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव करून भारतीय संघाचे चॅम्पियन होण्याचे स्वप्न भंग केले होते.