मेलबर्न : भारताविरूध्द तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी आॅस्ट्रेलिया संघ जानेवारीत भारत दौ-यावर येणार आहे. या मालिकेसाठी आॅस्ट्रेलियाचा संघ जाहीर करण्यात आला.
JUST IN: D'Arcy Short has been called into Australia's one-day squad for their tour of India next month https://t.co/0Gay4ukp63 #INDvAUS #BBL09 pic.twitter.com/MYr1ZkFxcG
— cricket.com.au (@cricketcomau) December 30, 2019
आॅस्ट्रेलियाने दुखापतग्रस्त अष्टपैलू खेळाडू शाॅन अॅबाॅटच्या जागी डर्सी शाॅर्टला संघामध्ये स्थान दिले आहे. अॅरन फिंचकडे संघाच्या कर्णधारपदाची धुरा असणार आहे.
आॅस्ट्रेलिया संघ : अॅरन फिंच (कर्णधार), अॅश्टन अॅगर, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, पीटर हँड्सकोम्ब, जोश हेझलवूड, मार्नस लाबूशेन, केन रिचर्डसन, डर्सी शाॅर्ट, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, अॅश्टन टर्नर, डेव्हिड वाॅर्नर, अॅडम झाम्पा.