पर्थ : जपानचा आघाडीचा टेनिसपटू केइ निशिकोरीने कोपराच्या दुखाुतीमुळे आगामी आॅस्ट्रेलियन ओपन आणि एटीपी कप टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. दुखापतीमुळे निशिकोरीला या वर्षी अमेरिकन ओपन स्पर्धेनंतर एकाही स्पर्धात्मक टेनिस स्पर्धेत सहभागी होता आलं नाही.
.@KeiNishikori has withdrawn from the #AusOpen with a right elbow injury. pic.twitter.com/jdrG9dVf3x
— #AusOpen (@AustralianOpen) December 30, 2019
जापानने एटीपी कप टेनिस स्पर्धेत निशिकोरीच्या जागी योशीहितो निशिओका याला संघात स्थान दिले आहे. निशिकोरीच्या आधी दुखापतीमुळे आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतून आतापर्यत अँडी मरे, रोजर फेडरर यांनी माघार घेतली आहे. निशिकोरी एकेकाळी जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी होता, मात्र त्याची सध्या १३ व्या स्थानी घसरण झाली आहे.
निशिकोरी म्हणाला, ” मी १०० टक्के तंदुरस्त नसल्याने, आॅस्ट्रेलियन ओपन आणि एटीपी टेनिस कप स्पर्धेतून माघार घेतो आहे.”