इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग : मुंबईचे राजे संघाचा विजय

पुणे – काही धक्कादायक निकाल आणि काही चुरशीच्या सामन्यानंतर मुंबईचे राजे संघ पुन्हा विजयी मार्गावर आला आहे. मुंबईचे राजे संघाने इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेत चेन्नई चॅलेंजर्सचा ब गटातील सामन्यात 32-28 असा पराभव केला. या विजयानंतर मुंबईचे राजे संघ सहा सामन्यानंतर सहा गुणांसह दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

मुंबईचे राजे संघाने आपल्या ताफ्यात दोन नवीन चढाईपटूचा समावेश करत आपले इरादे स्पष्ट केले. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघात चांगली चुरस पहायला मिळाली. एक-एक गुण मिळवण्यासाठी खेळाडू झुंजताना दिसले त्यामुळे पहिल्या क्वॉर्टरअखेरीस सामना 7-7 असा बरोबरीत होता.

दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये चेन्नई चॅलेंजर्स संघाने मुंबईचे राजे संघाविरुद्ध आक्रमक खेळ केला व आघाडी 14-9 अशी केली. महेश एम आणि मनवीरा कांथा यांनी सलग गुणांची कमाई केली. तरीही चेन्नई संघाने दुसऱ्या क्वॉर्टर अखेरीस 15-12 अशी आघाडी घेतली. चेन्नईच्या बचावफळीने चांगली कामगिरी करत संघाला तिसऱ्या क्वॉर्टरअखेरीस 22-19 अशी आघाडी घेतली.

चेन्नईच्या संघाने शेवटच्या क्वॉर्टरमध्ये दोन सलग सुपर टॅकल करत 26-20 अशी आघाडी मिळवली. यानंतर मुंबईचे राजे संघाच्या बचावाने चेन्नई संघाला सर्वबाद करत सामना 26-26 असा बरोबरीत आणला. यानंतर मुंबईचे राजे संघाचे चढाईपटू मनवीरा आणि महेश यांनी सहा सलग गुणांची कमाई करत संघाची गुणसंख्या 32 पर्यंत पोहोचवली.यानंतर चेन्नई चॅलेंजर्स संघाला पुनरागमन करणे जमले नाही व त्यांना 28-32 असे पराभूत व्हावे लागले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×