वॉशिंग्टन “एच-1बी’ व्हिसासाठी पात्र असलेल्या विशेष कौशल्य असलेल्या व्यक्तींना अल्पमुदतीचा बिझनेस व्हिसा न देण्याचा प्रस्ताव अमेरिकेतील विदेश विभागाने ठेवला आहे. या बिझनेस व्हिसाच्या आधारे अनेक कंपन्या आपल्या गुणवान कर्मचाऱ्यांना अल्पमुदतीसाठी अमेरिकेत पाठवत असतात. तंत्रज्ञानाशी संबंधित काही महत्त्वाची कामे अमेरिकेत राहून पूर्ण करण्यासाठी या व्हिसाचा उपयोग केला जात असतो. मात्र, आता विदेश मंत्रालयाच्या नवीन प्रस्तावानुसार शेकडो भारतीय युवकांना हा अल्पमुदतीचा व्हिसा मिळू शकणार नाही.
विदेश मंत्रालयाच्या या प्रस्तावाप्रमाणे जर अंतिम निर्णय घेतला गेला तर “एच’ धोरणाऐवजी “बी-1′ धोरणातील सूक्ष्म हेतूच नष्ट होईल. अनुमती असलेल्या कुशल तंत्रज्ञान अमेरिकेत येऊन पर्यायी उत्पन्न मिळवणे अनेकांना शक्य होत असे. तसेच अमेरिकेतील संसदेने स्थानिक उमेदवारांच्या हितासाठी केलेल्या “एच’ नॉन इमिग्रेशनच्या वर्गीकरणाच्या नियमांतून वाट काढणेही कंपन्यांना शक्य होणार नाही. या प्रस्तावामुळे अमेरिकेतील काम पूर्ण करण्यासाठी अल्पकालीन मुक्काम करण्यासाठी तंत्रज्ञान व्यावसायिकांना बी -1 व्हिसावर पाठविणाऱ्या अनेक भारतीय कंपन्यांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेतील अध्यक्षपदाची निवडणूक 3 नोव्हेंबर रोजी होत आहे. त्यापूर्वी दोन आठवडे हा प्रस्ताव मांडला गेला आहे.