तापसी पन्नू फालतू व्हिडिओ टाकून चर्चेत राहात नाही. विनाकारण काहीतरी बिकीनी घालून काढलेले फोटो काढलेत आणि ते सोशल मीडियावर टाकले आहेत असला आचरटपणा ती क्वचितच करताना दिसली.
View this post on Instagram
मात्र, जेव्हा एखाद्या विषयावर ठोस भूमिका घ्यायची असेल तर त्या त्यावेळी तिने ती घेतली आहे अन मांडली देखील आहे. त्याकरता कंगना राणावत टाइप पोरकटपणा तिने कधी केला नाही. मात्र, धाडस जरूर दाखवले. त्याचा मध्यंतरी तिला त्रासही झाला. चौकशीच्या फैऱ्यांत अडकावे लागले होते.
View this post on Instagram
आता तापसी पुन्हा सगळीकडे झळकते आहे. तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. त्याचे कारण तिने परदेशात भारतीय संस्कृतीचे केलेले नेतृत्व. तापसी कोणत्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत नाहीये. मात्र, तिने जे काही केले आहे, त्यामुळे ती प्रशंसेस पात्र ठरली आहे.
View this post on Instagram
त्याचे झाले असे की ती सध्या रशियात आहे. आपले कलाकार किंवा राजकीय मंडळी विदेशात जातात तेव्हा तिकडचे लोक घालतात तसेच कपडेही घालतात.
View this post on Instagram
महात्मा गांधी एक सन्माननीय अपवाद. त्यांनी विदेशातही पंचा नेसलेला. मात्र हल्ली कोणी चार दिवसांसाठी परदेशात जायचे म्हटले की शोभत असो वा नसो त्या लोकांची कॉपी करणारे कपडे घालतात. महिलाही तसेच करतात. मात्र तापसीने हा ट्रेंड मोडला.
View this post on Instagram
ती रशियात अगोदर मॉस्कोत आणि त्यानंतर आता सेंट पीटर्सबर्ग येथे चक्क साडीत दिसली. आता यावर त्यात काय विशेष असे कोणीही म्हणू शकेल मात्र खरेच हे विशेष आहे. परदेशातही भारतीय वेशभूषेत राहणे साधे सोपे नाही. तापसीने ते केले अन ती लक्षवेधी ठरली.
View this post on Instagram
रशियाबाबत बोलायचे झाले तर त्यांना बॉलीवूडबद्दल आणि येथील तारे तारकांबद्दल आकर्षण राहिले आहे. तुम्ही भारतात कोणाला ओळखतात असे जर तेथील सामान्य नागरिकांना विचारले तर ते आजही राज कपूर यांचे नाव सांगतील.
View this post on Instagram
त्यात आश्चर्य वाटायचे कारण नाही. अशा वेळी आपण राज कपूर यांच्या देशातूनच आलो आहे असे कदाचित तेथील लोकांच्या मनावर ठसवण्यात तापसी यशस्वी ठरली आहे.