चेन्नई – भारताचा युवा ग्रॅंडमास्टर बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंद याने चेसेबल मास्टर्स ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने उपांत्य लढतीत नेदरलॅंडचा ग्रॅंडमास्टर अनिष गिरी याच्यावर 3.5-2.5 अशी मात केली.
या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा प्रज्ञानंद भारताचा पहिलाच ग्रॅंडमास्टर बुद्धिबळपटू ठरला आहे. अंतिम फेरीत त्याची लढत चीनचा जागतिक दुसरा मानांकित खेळाडू डीन लिरीन याच्याशी होणार आहे. यापूर्वी प्रज्ञानंदने उपांत्यपूर्व फेरीत चीनचा वेई इ याच्यावर 2.5-1.5 अशी मात केली व उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.