मुंबई – मुंबई इंडियन्सकडून खेळताना श्रीलंकेचा युवा वेगवान गोलंदाज मथिशा पथिरणाने ( Matheesha Pathirana ) यंदाच्या आयपीएल स्पर्धेत केलेल्या कामगिरीवरून समीक्षक प्रचंड कौतुक करत आहेत. सध्या त्याच्या गोलंदाजीची चर्चा होत आहे.
श्रीलंकेचा हा युवा वेगवान गोलंदाज त्यांच्याच लसित मलिंगाची कार्बनकॉपी असल्याचे बोलले जात आहे. मलिंगा ज्या शैलीने गोलंदाजी करतो त्याचीच झलक पथिरणाच्या गोलंदाजीत दिसून येते. पथिरणा 19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत प्रकाशझोतात आला होता. आता ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत श्रीलंका संघात त्याची वर्णी लागण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.