नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघ पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये बांगलादेशचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ दोन कसोटी सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.
2019 साली या दोन संघात कसोटी मालिका खेळली गेली होती. यात कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या पिंक बॉल टेस्ट सामन्याचादेखील समावेश होता.
बांगलादेश क्रिकेट मंडळ 2021 ते 2023 दरम्यान होणाऱ्या मालिकेचे प्रसारण हक्क विकत आहे. ऑस्ट्रेलिया व भारतासह अन्य काही संघ बांगलादेशचा दौरा करणार आहेत. इंग्लंडचा संघही बांगलादेशमध्ये टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे.