नवी दिल्ली – भारताचा स्टार खेळाडू एच. एस. प्रणॉय व दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू यांनी येथे बुधवारपासून सुरू झालेल्या सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्यांच्यासह मिथुन मंजुनाथ व अस्मिता छलिया यांनीही पहिल्या फेरीत विजय मिळवताना दुसरी फेरी गाठली.
मिथुनने आपलाच सहकारी किदाम्बी श्रीकांतवर 21-17, 15-21, 21-18 असा विजय मिळवला. तर महिला एकेरीत अस्मिताने बुसानन ओग्बामुरुफनचा 21-16, 21-11 असा पराभव केला.
सिंधूने बेल्जियमच्या लिनेनी तानवर 21-15, 21-11 असा सहज विजय प्राप्त केला. पुरुष एकेरीत प्रणॉयने थायलंडच्या सीथीकोम थाम्मासीनवर 21-13, 21-16 अशी मात केली.