सिंगापूर – भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हीने येथे पार पडलेल्या सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. या विजेतेपदासह तीने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये केवळ रजतपदकच जिंकते हा शिक्का पूसुन काढला. तीला सातत्याने रजतकुमारी या नावाने डीवचले जात होते मात्र, ही स्पर्धा जिंकत तीने ही नामुष्कीची दूर केलीय.
लक्षवेधी
– ही स्पर्धा जिंकणारी पहिलीच भारतीय
– मोसमातील तिसरे विजेतेपद
– यापूर्वी स्वीस ओपन व सय्यद मोदी स्पर्धेत विजेती
रविवारी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूने महिला एकेरीत चीनच्या वांग झी यी हीच्यावर 21-9, 11-21, 21-15 अशी मात केली. सातव्या मानांकित सिंधूने 11 व्या मानांकित वांग झी यी हीचा अवघ्या 58 मिनिटांच्या लढतत पराभव केला. सिंधूचे यंदाच्या मोसमातील हे तिसरे आंतरराष्ट्रीय विजेतेपद ठरले. तर यंदाच्या मोसमातील तिचे पहिलेच सुपर 500 गटाच्या स्पर्धेचे विजेतेपद ठरले.
सिंधूने पहिल्या गेममध्ये वांगचा 21-9 असा सहज पराभव केला. मात्र, दुसऱ्या गेममध्ये वांगने पिछाडी भरून काढताना थाटात सामन्यात पुनरागमन केले व ही गेम जिंकत बरोबरीही केली. तिसऱ्या व निर्णायक गेममध्ये मात्र, सिंधूने वांगला कडवी लढत दिवी व ही गेम जिंकत विजेतेपदावरही नाव कोरले.