टोकियो: टोकिओ ऑलिंम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाचा सलामीचा सामना 25 जुलै रोजी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. तर महिला संघाचा पहिला सामना नेदरलॅंड विरुद्ध होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक महासंघाने मंगळवारी यासंदर्भातील वेळापत्रक जाहीर केले. न्यूझीलंडनंतर भारताचा मुकाबला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 26 जुलै रोजी होणार आहे. भारतीय संघ ग्रुप ए मध्ये असून 28 जुलै रोजी स्पेन, त्यानंतर गत विजेता अर्जेंटिनाविरुद्ध 30 जुलै रोजी आणि अखेर यजमान जपानविरुद्ध 31 जुलै रोजी भारताच्या पुरुष संघाची लढत होणार आहे.
महिलांचा संघाचा पहिला सामना 27 जुलै रोजी जर्मनी विरुद्ध होणार आहे. त्यानंतर 29 जुलै रोजी इंग्लंड, 31 जुलै रोजी आयर्लंड आणि एक ऑगस्ट रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय महिला संघाचा सामना होणार आहे. या वेळापत्रकानुसार महिला संघ सहा ऑगस्ट रोजी तर पुरुषांचा संघ सात ऑगस्ट रोजी सुवर्ण पदकांसाठी लढतील. जागतिक हॉकी क्रमवारीत भारताचा पुरुष संघ पाचव्या स्थानावर आहे.
भुवनेश्वरमध्ये झालेल्या पात्रता फेरीतच्या सामन्यात रशियाचा 11-3 ने पराभव करत भारतीय संघाने ऑलिंम्पिकचे तिकीट मिळवले होते. महिला संघ क्रमवारीत नवव्या स्थानावर आहे. त्यांनी पात्रता फेरीत अमेरिकाचे 6-5 ने पराभव केला आणि ऑलिंम्पिकचे तिकीट पटकावले होते.