नवी दिल्ली – केंद्र सरकारने भारतीय नौदलासाठी राफेल कंपनीची 26 प्रगत लढाऊ विमाने घेण्याचा निर्णय घेतला आहे. फ्रांसच्या डसॉल्ट एव्हिएशन कंपनीकडून ही विमाने घेतली जाणार असून भारताने या कंपनीकडून आधीच खरेदी केलेल्या 36 राफेल विमानांच्या व्यतिरिक्त ही विमाने असणार आहेत.
भारतात आयोजित चाचणी मोहिमेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे, या चाचणीत राफेलने भारतीय नौदलाच्या ऑपरेशनल आवश्यकता पूर्ण केल्या असे डसॉल्ट एव्हिएशनने म्हटले आहे. ही निवड राफेलच्या उत्कृष्टतेची पुष्टी करते, असेही डसॉल्ट एव्हिएशनने म्हटले आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील भारताच्या संरक्षण संपादन परिषदेने गुरुवारी भारतीय नौदलासाठी राफेल सागरी विमानांच्या खरेदीसाठी स्वीकृती मंजूर केली.
इतर देशांतील तत्सम विमानांच्या तुलनात्मक खरेदी किंमतीसह सर्व संबंधित बाबी विचारात घेऊन किंमत आणि खरेदीच्या इतर अटींबाबत फ्रान्स सरकारशी वाटाघाटी केल्या जाणार आहेत.